संभाजीनगर :
अनहद सोशल फाऊंडेशनच्या 'राईट टू लव्ह' उपक्रमातील पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांनी प्रेमविवाहातून खून झालेल्या अमितच्या कुटुंबीयांची इंदिरानगरमध्ये भेट घेतली. अमितच्या न्यायासाठी आणि विद्याच्या भवितव्याच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक पावले संस्थेच्या वतीने उचलली जातील अशी ग्वाही यावेळी कुटुंबियांना देण्यात आली.
या भेटी दरम्यान, कार्यकर्त्यांनी विद्या हिच्या पुढील भवितव्यासंदर्भात चर्चा केली. विद्याने पुढील शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली असून तिच्या शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन अनहद सोशल फाऊंडेशच्या राईट टू लव्ह उपक्रमामार्फत देण्यात आले. विद्याने आणि अमितने पोलिसांना आपल्या जीविताला धोका असल्याचे सांगून देखील पोलिसांनी आवश्यक ती पावले उचलली नाहीत त्यामुळेच अमितचा जीव गेला. या पार्श्वभूमीवर, राईट टू लव्ह उपक्रमाच्या वतीने पोलिसांनी प्रेम प्रकरणे कशी हाताळावी याबाबत विशेष सूचना आणि प्रशिक्षण देण्याबाबत निवेदन शासनासह पोलीस दलाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राईट टू लव्हच्या प्रतिनिधींनी अमितच्या कुटुंबाला मानसिक आधार दिला आणि आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. या भेटी दरम्यान, के. अभिजीत, सुनील ध्रुतराज, निखिल बोर्डे, मिलिंद दामोदरे, सिद्धार्थ लांडगे, विकास साळवे आणि करण राठोड तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
राईट टू लव्ह गेल्या 9 वर्षांपासून प्रेमी जोडप्यांच्या न्याय अधिकारांसाठी सातत्याने काम करत आहे. समाजात प्रेमविवाहाच्या स्वीकृतीसाठी आणि जोडप्यांच्या सुरक्षेसाठी जागृती आणि समर्थनाचे काम राईट टू लव्ह च्या वतीने सातत्याने केले जात आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
राईट टू लव्ह
अनहद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
मो. : 9766479547
No comments:
Post a Comment