पंचशील विद्यालय लखमापूर शाळेत वृक्षारोपण ; वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज - माजी आमदार प्रदीप नाईक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 12 August 2024

पंचशील विद्यालय लखमापूर शाळेत वृक्षारोपण ; वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज - माजी आमदार प्रदीप नाईक

माहूर  :  वृक्षारोपण करणे जेवढे गरजेचे आहे त्या पेक्षा लागवड करून झाडांचे संगोपन करणे तितकेच महत्वाचे आहे.वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी व्यक्त केले.


माहूर तालुक्यातील लखमापूर येथील पंचशील विद्यालयांमध्ये आज दिनांक 12 सोमवार रोजी वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा तीहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रदीप नाईक तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मेघराज जाधव, लखमापूरचे सरपंच गणेश राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल जाधव, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष विनोद राठोड,शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी डी के मूनेश्वर, डी.के.राठोड,ग्राम पंचायत सदस्य संतोष राठोड, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सरफराज दोसाणी, पत्रकार सिद्धार्थ तामगाडगे,दत्ता जाधव,गोविंद मगरे पाटील,मनोज कीर्तने,नम्रता किर्तने,ग्राम पंचायत सदस्य प्रविण बरडे,पत्रकार नितेश बनसोडे,पत्रकार राज ठाकूर, पत्रकार इलियास बावाणी,पत्रकार पठाण यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.

लखमापूर येथील पंचशील विद्यालयात मोठ्या प्रमाणात परिसरातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांची प्रगती होत असून शाळेचे नाव ही लौकिक होत आहे .एका मागे एक दर वर्षी विद्यार्थी चांगल्या गुणांनी १० वी ची परीक्षा उत्तीर्ण होत आहे ही बाब लखमापूर ग्रामपंचायत साठी भुशावह असल्याचे मत कृषीउत्पन्न बाजार समिती संचालक निखिल जाधव यांनी व्यक्त केले.या वेळी विद्यार्थी, पालक, पत्रकार मंडळी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages