बिलोली : जयवर्धन भोसीकर
युगकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून तुफानातले दिवे हा पत्रकारितेतील पुरस्कार पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष, पत्रकार महेंद्र गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. गेल्या एकवीस वर्षांपासून महेंद्र गायकवाड यांचे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. दिनांक 24 ऑगस्ट रोजी नांदेड येथील कुसुम सभागृहात होणाऱ्या एका भव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आयोजक संजय निवडंगे यांनी दिली आहे.
बिलोली सारख्या ग्रामीण भागातून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महेंद्र गायकवाड यांनी गेल्या एकवीस वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी त्यांचा लढा नेहमीच असतो.यापूर्वी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय गुणिजन गौरव पत्रकारिता पुरस्कार व विविध पुरस्कार महेंद्र गायकवाड यांना मिळाले आहेत.पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातून त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून दिला आहे.त्यांच्या या योगदानाची दखल घेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते संजय निवडंगे व संयोजन समितीने गायकवाड यांना तुफानातले दिवे हा पुरस्कार जाहीर केला आहे. युगकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नांदेड येथील कुसुम सभागृहात आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार जयवर्धन भोसीकर यांना देण्यात आला होता,आंबेडकरी आणि सामजिक कार्याची दखल घेवून हा पुरस्कार देण्यात येतो..पत्रकार संरक्षण समिती चे जिल्हाअध्यक्ष महेंद्र गायकवाड यांना मिळालेल्या पुरस्कारा बदल राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment