किनवट : तहसील कार्यालयात जन्म व मृत्यू नोंदणी साठी दाखल केलेले अर्ज,प्रकरणे बरेच महिन्यापासून प्रलंबित असून त्या अर्जाच्या अनुशंगाने आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. अर्जानुसार योग्य ती तात्काळ कार्यवाही करुन अर्ज,प्रकरण निकाली काढावीत,अशी मागणी एका निवेदनाद्वारे आज(दि.२) तहसीलदार यांच्याकडे अभिवक्ता संघ , किनवटच्या वतीने करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की,तहसील कार्यालयात दाखल अर्जावर आजपर्यंत आपल्या कार्यालयाने कुठलीही कार्यवाही केल्याचे दिसुन येत नाही.यामुळे पक्षकारांची हेळसांड होत आहे. विनाकारण प्रकरणे प्रलंबीत ठेवल्याने अर्जदारांना जन्म,मृत्युच्या प्रमाणपत्राअभावी शैक्षणिक, आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.यामुळे अर्जदार वारंवार वकिलसंघाकडे तक्रार करत आहेत.
जन्म,मृत्यु नोंदणी साठी दाखल केलेले अर्ज प्रकरणात सन्माननीय न्यायालयाने तात्काळ कार्यवाही करुन अर्जदारांस न्याय द्यावे वअर्जदाराचेअर्ज निकाली काढावेत.
निवेदनावर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. आर. डी. सोनकांबळे , उपाध्यक्ष
अॅड. श्रीकृष्णा मो. राठोड व सचिव एस.पी.सिरपुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.निवेदन देतांना अनेक वकील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment