मोबाईलचा अतिवापर टाळून शारीरिक दृष्ट्या सक्षम व्हा-पद्मश्री उदय देशपांडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 11 January 2025

मोबाईलचा अतिवापर टाळून शारीरिक दृष्ट्या सक्षम व्हा-पद्मश्री उदय देशपांडे


गोवेली ( प्रतिनिधी) :  आजच्या डिजिटल युगात वाढत्या सोशल मीडियाच्या वापरामुळे आजची पिढी मोबाईलचा अतिवापर करताना दिसून येते. त्यामुळे  त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढली आहे. आणि म्हणूनच या साऱ्याचा विचार केला असता विद्यार्थ्यांना मानसिक दृष्ट्या प्रबळ करण्यासाठी तसेच शारीरिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गोवेली, अश्वमेध प्रतिष्ठान आणि इंटर ठाणे आयोजित  दि 9 जानेवारी 2025 रोजी मल्लखांब क्षेत्रातील प्रमुख , पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले मा.उदय देशपांडे यांचे मार्गदर्शन आयोजिले होते. यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या घडीला मैदानी खेळांचे महत्त्व समजावत शरीरातील विविध क्षमता विकसित करण्यासाठी मल्लखांब किती उपयुक्त आहे याचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम त्याचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळेस त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांकडून मल्लखांब चे विविध प्रकार, आसन प्रात्यक्षिक रित्या करून घेतले. तसेच त्यांची विद्यार्थिनी प्रचिती देसाई,शरयू केणे यांनी देखील विद्यार्थ्यांना मल्लखांब प्रात्यक्षिकरित्या  करून दाखवलं.  त्याचबरोबर जेष्ठ गिर्यारोहक प्रवीण पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मल्लखांब विषयी मार्गदर्शन केले त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना मल्लखांब चा इतिहास सांगितला. यावेळेस जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, प्रा. डॉ के बी कोरे,उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला .



No comments:

Post a Comment

Pages