नांदेड :
महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध भारतामध्ये प्रसिद्ध असलेले तथा महाराष्ट्र शासनाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेले व बुद्ध कालीन बावरी ब्राह्मणाचे स्मरणार्थ “ बावरीनगर ” म्हणून संबोधिल्या जाणार्या महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे दि. १३ व १४ जानेवारी २०२५ रोजी दर वर्षीप्रमाणे दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला प्रारंभ होणार आहे.
देश विदेशातील विद्वान भिक्खु तथा लाखों लोकांचा जन समुदाय मोठ्या श्रद्धेने या परिषदेत भाग घेत असतो, त्यामुळे येणाऱ्या पाहुणे मंडळींची तथा उपस्थित असणाऱ्या जनतेची कुठलीही गैरसोय होऊ नये, या करीता जिल्हाधिकारी महोदयांनी महाविहार बावरीनगर येथे विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली व सर्व विभागांना परिषदेच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सूचना केल्या.
तसेच धम्म परिषदेचे संयोजक डॉ. एस. पी. गायकवाड यांचेशी चर्चा करत परिषदेच्या आयोजनासंबंधी असणाऱ्या अडी-अडचणी जाणून घेतल्या व तत्काळ संबंधितांना अडचणी सोडविण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी, डीवायएसपी, तहसीलदार नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, मंडळ अधिकारी आदी तसेच पू. भिक्खु डॉ. एम. सत्यपाल, भिक्खु बुद्धभूषण, अशोक गोडबोले, प्रा डॉ मिलिंद भालेराव, डी डी भालेराव, बी एम वाघमारे, एस टी पंडित, डी पी गायकवाड, ईश्वर सावंत यांसह उपासक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment