किनवट : माजी राज्यसभा सदस्य आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. विकास महात्मे हे 21 व 22 फेब्रुवारी रोजी बेल्जियमच्या ब्रुसेल्स येथे आयोजित ‘जीसीपीआर’ (ग्लोबल कौन्सिल फॉर पॉलिटिकल रिन्यूअल) या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
‘जीसीपीआर’ कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष म्हणून डॉ. महात्मे नैतिक राजकारण, पारदर्शकता आणि मानव केंद्रित प्रशासनाच्या संकल्पनांचा पुरस्कार करतील. या परिषदेत जगभरातील मान्यवर, राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि धोरणनिर्माते विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचारमंथन करणार आहेत.
‘‘भारताची ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही तत्वज्ञानप्रधान नीती जागतिक राजकीय नूतनीकरणासाठी प्रेरणादायी ठरू शकते,’’ असा विश्वास डॉ. महात्मे यांनी व्यक्त केला. प्रशासन सुधारणा, जबाबदारी, नैतिक नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या मुद्द्यांवर भर देत, सर्वसमावेशक आणि नैतिक राजकीय प्रणालीसाठी अर्थपूर्ण चर्चा घडवून आणणे, हे त्यांच्या सहभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘जीसीपीआर’ ही संस्था नैतिक राजकारण, मानवी हक्क आणि उपाययोजना, पर्यावरण व न्याय्य विकास, मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून जागतिक शांतता, तसेच शिक्षण व संशोधन अशा विविध विषयांवर कार्यरत आहे.
No comments:
Post a Comment