नांदेड येथील महामोर्चात बौद्ध बांधवांनी सहभागी व्हावे रिपाइं चे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार यांचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 24 March 2025

नांदेड येथील महामोर्चात बौद्ध बांधवांनी सहभागी व्हावे रिपाइं चे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार यांचे आवाहन


किनवट,दि २४ : बिहार राज्यातील  येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी नांदेड येथे मंगळवारी (दि.२५) दुपारी १२ वाजता भिख्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विविध आंबेडकरी पक्ष, संघटना व समस्त बौद्ध समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नांदेड येथून महामोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा महात्मा फुले पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचणार आहे. यावेळी जिल्हाधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या महामोर्चात किनवट तालुक्यातील हजारो बौद्ध समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रिपाइं (आठवले)चे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages