२३ मार्च २०२१ हा स्मृतिदिन आहे प्रशासनातील एक कर्तव्यदक्ष आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा... अर्थात का. सुधाकरराव कांबळे साहेबांचा याच २३ मार्च रोजी सुधाकरराव कांबळे साहेबांची प्राणज्योत मालवली आणि अखंड अशा दूरदृष्टी आणि प्रशासनाच्या एक कर्तव्यदक्ष आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला...
स्मृतीशेष सुधाकरराव चांदोबा कांबळे यांचा जन्म ५ मे १९६२ रोजी नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे झाला. अगदी लहान वयापासूनच बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शिक्षणाचा वसा त्यांनी आत्मसात केला.. यात त्यांना साथ मिळाली त्यांच्या आई-वडिलांची त्यांच्या प्रेरणेने सातत्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन शिक्षणाची कास धरली.. आणि मनातील जे ध्येय होते प्रशासनात आपले कर्तव्य राबवायचे. या सगळ्या गोष्टींचं गाठोड घेऊन आणि जिद्द उराशी बाळगून प्रशासनामध्ये सेवा करण्यासाठी सज्ज झाले आणि प्रथम जिल्हा परिषद बांधकाम विभाग कंधार येथे मार्ग लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
यासाठी आपण परिकष्ट करत होतो ते हाती मिळाल्यानंतर प्रशासनामध्ये अल्पावधीतच आपल्या कार्याची छाप त्यांनी सोडली.. प्रशासनाचा कारभार सांभाळत असताना सातत्याने शेवटपर्यंत समाज सुधारकांचा वसा तथा इतरांच्या प्रति आदर आणि प्रेमभाव हे त्यांच्या मनात ठासून भरले होते.
खऱ्या अर्थाने त्यांचा कार्यकाळ आणि त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून सामाजिक सेवा बजावत आली ती म्हणजे हिमायतनगर येथे २००८ ते २०१७ पर्यंत त्यांनी जी सेवा बजावली जवळपास दहा वर्षांची या सेवेमध्ये त्यांनी सातत्याने गोरगरीब जनतेच्या हितासाठी आणि प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्याला कोणताही गालबोट न लावता सेवा बजावली...
हिमायतनगर येथील प्रत्येकांना ते हवे होते गोरगरीब जनता हक्काने त्यांच्यासमोर जाऊन आपले प्रश्न मांडायची आणि एका झटक्यामध्ये त्यांचे प्रश्न समाधानात मिटवायच परमकार्य कांबळे साहेबांनी केलं.
त्यांच्या कार्य - काळामध्ये एक निष्कलंक कर्मचारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आहे त्या सर्व गोष्टीवर समाधान मानण्याचं धाडस केवळ कांबळे साहेबांकडे होते. हिमायतनगर येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर असून कुठलाही गर्व आणि अहंकाराणे कधी त्यांच्याजवळ स्पर्शही नाही केला. प्रचंड बुद्धिमत्ता व्याप्त जनसंपर्क, लहानांपासून मोठ्यांचा आदर आणि समाज सुधारकांच्या विचारांची प्रेरणा याशिवाय त्यांच्याकडे कोणतीही शिदोरी नाही. आणि त्यांनी ती काबीज करण्याचा प्रयत्नही नाही केला. तेच संस्कार त्यांनी आपल्या मित्रपरिवारा समवेत नातलग आणि स्वतःच्या परिवारावर बिंबवण्याचा प्रयत्न केला.. हिमायतनगर ला प्रचंड सेवा दिल्यानंतर उमरी येथे त्यांनी काही काळ प्रमोशनच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा बजावली आणि ३१/५/२०२० रोजी ३१ वर्षाची प्रदीर्घ सेवा देऊन ते सेवानिवृत्त झाले. परंतु केवळ ते प्रशासनाच्या कार्यातून सेवानिवृत्त झाले होते मनाच्या कार्यातून कधीही ते सेवानिवृत्त नव्हते परंतु सातत्याने बळकवणारा आजार आणि शरीरात उत्पन्न होणाऱ्या व्याधी या सगळ्या गोष्टीवर त्यांनी मात केली होती. कारण ते धाडस आणि ती ध्येयवादी विचारसरणी या गोष्टीमुळे त्या सगळ्या गोष्टीवर मात करू शकले. परंतु कांबळे साहेबांच्या ध्येया पेक्षा मोठे होते त्यांच्यावर घोंगाळणारे संकटे, सातत्याने विविध संकटावर मात करणारे कांबळे साहेब परंतु शेवटच्या क्षणी शरीरावर आणि त्यांच्या व्याधीवर मात करू शकले नाही.. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांची सेवा त्यांची दोन्ही मुले व त्यांच्या सौभाग्यवतीने केली परंतु नियतीला मान्य नव्हतं... ज्या पद्धतीने कांबळे साहेब सेवानिवृत्त होतात केवळ एकाच वर्षांमध्ये आयुष्याच्या इनिंग मधून सुद्धा कायमचे दूर गेले २३ मार्च २०२१ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.. आणि जे सेवानिवृत्तीनंतर आयुष्यात आपल्या परिवारासाठी ते वेळ देणार होते आपल्या नातवंडासाठी ते सहवास देणार होते तो काळ यां नियतीने हिरावून घेतला.. आणि कांबळे परिवार कायमचा पोरका झाला..
त्यांचे ध्येयवादी कार्य चीर निरंतर काळ प्रशासनाच्या त्यांच्या परिवाराच्या आणि मित्र परिवाराच्या काळजावर अधिराज्य गाजवत राहील....!
अशा या महान दूरदृष्टी लाभलेल्या नेतृत्वाला आणि मित्रपरिवारासमवेत संपूर्ण त्यांचे हितचिंतक मुकले... अशा या आयुष्यभर प्रेरणा देणाऱ्या आणि आयुष्याचे नंदनवन करणाऱ्या महान व्यक्तिमत्व का. सुधाकरराव कांबळे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...
- कवी रमेश उत्तमराव पंडित
हिमायतनगर
7276 358 143
No comments:
Post a Comment