नांदेड , सम्यक सर्पे :
शहरातील मिशन ऑफिसर्स फिजिकल अकॅडमी ,सामाजिक कार्यकर्ते साहेबराव गायकवाड ,गब्बर सोनवणे, आतिश ढगे यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड शहरात 5 एप्रिल रोजी ' मॅरेथॉन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महामानवांच्या संयुक्त जयंती निमित्य मुला- मुलींच्या व्यायामाप्रती उत्साह वाढवण्यासाठी 18 वर्षापुढील युवक - युवतींकरिता खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी नांदेड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सकाळी 6 वाजता या मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात होणार आहे.
5 किमी (18 वर्षापुढील मुले ) , 3 किमी ( मुली 18 वर्षापुढील ) अश्या 2 अंतरांचा समावेश आहे.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 5000 सन्मानचिन्हासह , द्वितीय 2500 सन्मानचिन्हासह,तृतीय 1000 सन्मानचिन्हासह तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक 500 पुरुष स्पर्धक , 500 महिला स्पर्धक यांना देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी लखन कार्ले सर यांच्याकडे 4 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत नाव नोंदणी करून विनामूल्य सहभागी होता येणार आहे .
समाजात दिवसेंदिवस पसरत चाललेल्या विषमतेच्या वातावरणामध्ये समतेचा विचार रुजविण्याचा संदेश या मॅरेथॉन च्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच सामाजिक आरोग्य टिकविण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी , असे आवाहन लखन कार्ले सर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment