मराठी भाषेच्या बोलीवैभवाचा जागर : गोवेली येथे २३ जानेवारीला ‘बोलींचा जागर’
कल्याण : मराठी भाषा ही विविध बोलींनी नटलेली, समृद्ध आणि सशक्त भाषा आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत बोलल्या जाणाऱ्या बोली या मराठी भाषेचे वैभव असून त्या त्या प्रदेशाची सामाजिक-सांस्कृतिक ओळख जपतात. या बोलींचे जतन, संवर्धन व अभ्यास घडावा, या उद्देशाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत ‘बोलींचा जागर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत गोवेली येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
मराठी भाषेतील विविध बोली या भाषेची ताकद असून त्या लोकजीवन, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवतात. या बोलींचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासन मराठी विभाग , भाषा संचालनालय, विद्यापीठे व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने ‘बोलींचा जागर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० ते १०.०० या वेळेत ग्रंथदिंडी व शोभायात्रेने होणार असून त्यानंतर सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या कालावधीत मुख्य कार्यक्रम होईल. मुख्य कार्यक्रमात बोलींचा जागर, प्रातिनिधिक वारली व कुपारी या स्थानिक बोलींतील पारंपरिक लोककलांचे सादरीकरण, संवाद तसेच बोलीभाषा अभ्यासकांचे मार्गदर्शन यांचा समावेश असणार आहे.
या कार्यक्रमासाठी डॉ. नेहा सावंत आणि डॉ. रुपेश कोडिलकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. रवींद्र घोडविंदे राहणार आहेत.
या उपक्रमाचे निमंत्रण माननीय डॉ. उदय सामंत, मंत्री, मराठी भाषा व उद्योग, माननीय डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, मराठी भाषा विभाग तसेच माननीय श्री. अरुण गिते, भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य डॉ. अशोक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून प्रा. हरेंद्र सोष्टे (मराठी विभाग प्रमुख) आणि प्रा. सतीश लकडे (सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग) हे कार्यक्रमाचे संयोजक आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठी भाषेच्या विविध बोलींचा सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या या ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, भाषा अभ्यासक, साहित्यप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment