किनवट येथे हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी
किनवट : हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी सोहळा किनवट शहरात उत्साहात साजरा करण्यात आला असुन या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात ध्वजारोहन करून मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणानी परिसर दाणाणून गेला होता.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किनवट शहर व तालुक्याच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त युवानेते करण एंड्रलवार यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले असुन छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेलाउपस्थितानी हार अर्पण करून अभिवादन केले. हिंदुरुदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्षे असल्यामुळे शिवसैनिकांनी मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जय भवानी जय शिवाजी..! व हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे.. अमर रहे..! अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील, माजी तालुकाप्रमुख राम पाटील कोरडे,शहर प्रमुख प्रशांत कोरडे, युवासेना तालुका प्रमुख अतुल दर्शनवाड,संतोष यलचलवार,प्रभू कोल्हे, राकेश गंनोजवार,प्रमोद जाधव, संतोष तक्कलवार, सुनील तक्कलवार,महेश भंडारे, शिवा तिरमनवार,निशांत बोलेनवार, विकास गंनोजीवार, अनंत क्यतमवार, राजू जोशी, राजू सातूरवार,प्रवीण रेड्डी, संतोष कटकमवार, गोलू ताडपेल्लीवार,मोहक पांचाळ, गजानन सूर्यवंशी, संजय मेश्राम, मुबारक भाई, श्याम कोरडे पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोकुंदा येथील ठाकरे चौकात अभिवादन
किनवटपासून जवळच असलेल्या गोकुंदा येथील स्व बाळासाहेब ठाकरे चौकातही शेकडो शिवसैनिकांनी स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. युवासेना तालुकाप्रमुख अतुल दर्शनवाड व संजय मेश्राम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

No comments:
Post a Comment