जिजाऊ ते सावित्री : किनवटमध्ये वैचारिक जागराचा भव्य सोहळा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 19 January 2026

जिजाऊ ते सावित्री : किनवटमध्ये वैचारिक जागराचा भव्य सोहळा

 जिजाऊ ते सावित्री : किनवटमध्ये वैचारिक जागराचा भव्य सोहळा



किनवट  : राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त “जिजाऊ ते सावित्री – वैचारिक जागर” या भव्य गायन व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता.२४) सायंकाळी ५:३० वाजता दुर्गा मैदान, किनवट येथे करण्यात आले आहे.

    या वैचारिक पर्वात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत आणि सिनेगीतकार प्रा. डॉ. विनायक पवार यांचा प्रभावी काव्यजागर व प्रबोधन सादर होणार आहे. राजमाता जिजाऊ यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या प्रेरक विचारांपासून ते सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, समता व सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतिकारी विचारांपर्यंतचा वैचारिक प्रवास या कार्यक्रमातून उलगडणार आहे.

    कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी  सुजाता विनोद एंड्रलवार राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य शुभांगी प्रशांत ठमके उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून अॅड. मनोज आखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

याशिवाय विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन बबन वानखेडे यांनी केले असून, संयोजन शुभम शिंदे, तर निमंत्रक ए.पी. जाधव आहेत.या वैचारिक जागराला नागरिक, युवक आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विचारांचा दीप प्रज्वलित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages