संथागार वृद्धाश्रमात नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षसह नगरसेवकांचा सत्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 19 January 2026

संथागार वृद्धाश्रमात नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षसह नगरसेवकांचा सत्कार

संथागार वृद्धाश्रमात नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षसह नगरसेवकांचा  सत्कार 


किनवट : येथील संथागार वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेचा सन्मान करणारा गौरवपूर्ण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास शिवसेना(उबाठा) चे जिल्हा प्रमुख ज्योतिबा  खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन नगराध्यक्षा सुजाता विनोद यंड्रलवार, उपनगराध्यक्ष मोहमद हसन खान पठान तसेच नगरसेवकांचा पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

    यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण आळणे व माजी नगरसेविका करुणा आळणे यांच्या हस्ते  नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. अभय महाजन, प्रवीण राठोड, श्रीराम नेम्मानीवार, चंद्रशेखर नेम्मानीवार, गंगाबाई कोल्हे, अश्विनी जागरलावार, ललिता मुनेश्वर, नईसा बेगम मिर्झा सईद बेग आणि निलोफर निसार भाटी यांना पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

   कार्यक्रमादरम्यान उपस्थित  लोकप्रतिनिधींनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.यावेळी सामाजिक सलोखा, सेवाभाव आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

No comments:

Post a Comment

Pages