२०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 20 January 2026

२०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधान

 २०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधान




नांदेड : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नांदेड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राहुल एस. एम. प्रधान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाच्या मुख्य संयोजकपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.


      यावेळी यशवंत मकरंद, डॉ. भारत शिरसाठ, अनंत भवरे, डॉ. अनंत राऊत, प्रा. प्रबुद्ध चित्ते, संतोष आगबोटे, नितीन एंगडे, आसावरे, प्रसेनजीत मांजरेकर, प्रकाश इंगोले, राहुल जोंधळे, दिनेश लोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

    यापूर्वी पार पडलेल्या बैठकीत संमेलनाच्या इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कादंबरीकार डॉ. अनंत राऊत यांची कोषाध्यक्षपदी, रंगकर्मी डॉ. विजयकुमार माहुरे यांची मुख्य समन्वयकपदी, तर कवी व माध्यम अभ्यासक डॉ. राजेंद्र गोणारकर यांची विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य निमंत्रकपदी निवड करण्यात आली असल्याचे ढमाले यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Pages