संभाजीनगर महापौर खुल्या (ओपन) प्रवर्गासाठी राखीव; भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
छत्रपती संभाजीनगर - महानगरपालिकेतील महापौर पदासाठी अखेर खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले असून, यामुळे शहरातील राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे. निवडणूक निकालानंतर प्रतीक्षेत असलेले आरक्षण स्पष्ट झाल्याने आता सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. आता खुला गट असल्याने सर्वच उमेदवार महापौरपदाच्या रेस मध्ये आले आहे. खुला प्रवर्ग असला तरी त्यात राखीव गटातून विजयी झालेले नगरसेवक देखील त्यात आपला अर्ज देऊ शकतात. त्यामुळे भाजपा आता नेमकी काय राजकीय खेळी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी स्पष्ट बहुमताच्या एका जागेने दूर आहे. मात्र जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी अन्य पाच नगरसेवक आमच्या सोबत असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे महापौर हा भाजपचाच असणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान, आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेवर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी व लातूरच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यावर मंत्री माधुरी मिसळ यांनी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आक्षेपावर विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
--------------------------
पक्षीय बलाबल
- भारतीय जनता पार्टी – 57
• एमआयएम – 33
• शिवसेना – 13
• शिवसेना – 6
• काँग्रेस – 1
• वंचित – ४

No comments:
Post a Comment