माकपाच्या वतीने घरकुल व मनरेगाच्या प्रलंबित देयकांच्या मागणीसाठी 27 रोजी पंचायत समिती घेराव आंदोलन घरकुल लाभार्थी व मजुरांनी सहभागी होण्याचे आवाहन.! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 22 January 2026

माकपाच्या वतीने घरकुल व मनरेगाच्या प्रलंबित देयकांच्या मागणीसाठी 27 रोजी पंचायत समिती घेराव आंदोलन घरकुल लाभार्थी व मजुरांनी सहभागी होण्याचे आवाहन.!

माकपाच्या वतीने घरकुल व मनरेगाच्या प्रलंबित देयकांच्या मागणीसाठी 27 रोजी पंचायत समिती घेराव आंदोलन

घरकुल लाभार्थी व मजुरांनी सहभागी होण्याचे आवाहन.!


किनवट : 

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत असंख्य घरकुल लाभार्थीचें प्रलंबित देयके आद्याप मिळाली नाहीत, त्याच सोबत गेली अनेक दिवस मनरेगा अंतर्गत व्यक्तीक व सार्वजनिक कामांची मजुरांची मस्टर पेमेंट राखडली आहेत. किनवट तालुका दुष्कळाच्या अनुषंगाने तातडीने मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कामे काढून मजूर व शेतकऱ्यांनाच्या हाताला काम देण्याच्या प्रमुख मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयावर बेमुदत घेराव आंदोलन करत असल्याची माहिती माकप नेते कॉ. अर्जुन आडे यांनी दिले आहे.

आंदोलनाच्या अनुषंगाने माकप गाव पातळीवर मजूर व घरकुलाभार्थ्यांना संघटित करत असून आंदोलनाच्या बाबत गाव पातळीवर जनजागृती मोहीम माकप ने सुरू केली आहे.

*या आहेत प्रमुख मागण्या*

सर्व मंजूर घरकुल लाभार्थ्यांचे सरसकट प्रलंबित देयके विना विलंब अदा करा, केंद्र व राज्य सरकारने आवास योजने करिता दोन लक्ष दहा हजार याप्रमाणे सर्व घरकुल लाभार्थ्यांना अनुदान लागू करा,आगामी काळात घरकुल अनुदान रक्कम पाच लक्ष पर्यंत वाढवा, मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या व्यक्तिगत व सार्वजनिक कामांची कुशल व अकुशल देयके मस्टर पेमेंट त्वरित अदा  करा, बंद असलेली सार्वजनिक, वैयक्तिक लाभाची कामे चालू करून मजुरांच्या हाती काम द्या, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आणेवारी 36 टक्के च्या खाली असल्यामुळे मजुरांना व शेतकऱ्यांना कामे मिळण्याकरिता मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कामे सुरू करा, पूर्वीची मनरेगा योजना सुरू ठेवून ती अधिक सक्षम करा, तालुक्यातील ग्रामीण भागातील सरकारी नकाशावरील सर्व  पानदान रस्त्यांचे काम तातडीने सुरू करा, बांधकाम कामगारांना लागणारे 90 दिवसाचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सहीने निर्गमित करण्याची व्यवस्था करा, रोजगार सेवकांना सरकारने जाहीर केलेल्या जीआर ची अंमलबजावणी करून वाढीव मानधन द्या. या प्रमुख मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहे.

आंदोलनात घरकुल लाभार्थी मजूर बांधव व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जनार्दन काळे, शैलीया आडे, इरफान पठाण, खंडेराव कानडे,शेषराव ढोले,आडेलू बोनगीर,सिताराम आडे,तानाजी राठोड,राम कनडेल, मोहन जाधव, विजय जाधव, मनोज सल्लावार,सुदाम बर्गे,शिवाजी किरवले,साईनाथ राठोड, प्रशांत जाधव,रंगराव चव्हाण, सुनिता बोनगीर, इंदल राठोड, फरीद बाबा, नंदू मोडूकवार आदींनी केले आहे

No comments:

Post a Comment

Pages