कै. उत्तमराव राठोड उपकेंद्र, किनवट येथे हिवाळी-२०२५ परीक्षा उत्साहात व सुरळीत संपन्न
किनवट (प्रतिनिधी): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत असलेल्या कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र (उपकेंद्र), किनवट येथे 'हिवाळी-२०२५' सत्राच्या परीक्षा नुकत्याच अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडल्या.
या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन आणि परीक्षा संचालक डॉ. हुशारशिंग साबळे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. विद्यापीठ प्रशासनाच्या विशेष लक्षामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया विनाअडथळा पार पडली.
या केंद्रावर समाजकार्य विभागातील बी.एस.डब्ल्यू. (BSW) आणि एम.एस.डब्ल्यू. (MSW) या दोन्ही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. उपकेंद्राचे समन्वयक डॉ. मार्तंड कुलकर्णी यांच्या सूक्ष्म नियोजनाखाली संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात आली.
परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र प्रमुख डॉ. नितीन गायकवाड आणि सह-केंद्र प्रमुख डॉ. योगेश अंबुलगेकर यांनी विशेष जबाबदारी सांभाळली, तर तंत्र सहाय्यक प्रा. श्रीकांत दुधारे यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार घडू नये आणि पारदर्शकता जपली जावी, यासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.
ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी उपकेंद्रातील प्राध्यापक डॉ. प्रवीण खंडागळे, डॉ. प्रमोद राठोड, प्रा. प्रिती देवस्थळे, प्रा. चेतन जाधव, प्रा. श्रीराम पवार तसेच कर्मचारी विठ्ठल हंबर्डे, रमेश जाकुलवार, वर्षाताई,रामभाऊ टेकाम, सुरक्षा रक्षक राजू जाधव, मुरली, सुनील टेकाम आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी हे केंद्र नेहमीच कटिबद्ध राहिले आहे. यंदाची परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडल्याबद्दल विद्यापीठ वर्तुळातून समाधान व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment