नांदेडमधील २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांना मिळणार हक्काचा मंच
युवा मंचासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड : येथील सायन्स कॉलेजच्या भव्य मैदानावर आगामी २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी २० वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सांविधानिक मूल्यांना समर्पित असलेल्या या संमेलनात युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'युवा मंचा'चे खास आयोजन करण्यात आले असून, यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
हे संमेलन केवळ साहित्यापुरते मर्यादित न राहता कला, संस्कृती, भाषा, समाजकारण आणि अर्थकारण अशा विविध विषयांवरील वैचारिक मेजवानी ठरणार आहे. भाषा, प्रांत, धर्म आणि जातीच्या सीमा ओलांडून समाजात एकमयता निर्माण करणे, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सांविधानिक मूल्यांची रुजवण व्हावी आणि त्यांच्यातील अभिव्यक्तीला योग्य दिशा मिळावी, यासाठी 'युवा मंच' सज्ज झाला आहे. या युवा मंचा अंतर्गत कलाविष्कार: वक्तृत्व, एकांकिका, प्रबोधनपर गीते, पोवाडा, जलसा, नाटक, कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद, रॅप साँग,चित्रकला, शिल्पकला, पथनाट्य आणि वेशभूषा आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा येईल आणि समाजातील घडामोडींकडे पाहण्याचा एक डोळस दृष्टिकोन विकसित होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.
या संमेलनातील विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी होण्यासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, महाविद्यालयातील प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली नावे १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत नोंदवणे अनिवार्य आहे.नोंदणी केलेल्या स्पर्धकांची २१ फेब्रुवारी २०२६ रोजी चाचणी घेतली जाईल.आणि निवड झालेल्या स्पर्धकांना संमेलनाच्या मुख्य युवा मंचावर सादरीकरणाची संधी दिली जाईल आणि त्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कसल्याही प्रकारचे शुल्क नाही.त्यामुळे ज्यांना या उपक्रमात भाग घ्यायचा आहे.त्यांनी पवन जगडमवार ९१३०३२६३९२,अतिश ढगे ७७७५८४०२७३,प्रबुद्ध चित्ते ८९२८८४२५७७,तेजस्विनी कांबळे, सिद्धार्थ वाघमारे,गोविंद पाटील,प्रफुल्ल कऊटकर,किरण पडलवार, प्रा.डॉ.जे टी जाधव, प्रा प्रबुद्ध चित्ते Prabudh Chitte , प्रा. सुप्रिया गायकवाड, डॉ. ज्योती सरोदे आदी समन्वयकांशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:
Post a Comment