किनवटचे आदिवासी संशोधन केंद्र बनणार सामाजिक परिवर्तनाचे व्यासपीठ; डॉ. नितीन गायकवाड यांनी स्वीकारला समन्वयक पदाचा पदभार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 14 February 2026

किनवटचे आदिवासी संशोधन केंद्र बनणार सामाजिक परिवर्तनाचे व्यासपीठ; डॉ. नितीन गायकवाड यांनी स्वीकारला समन्वयक पदाचा पदभार

किनवटचे आदिवासी संशोधन केंद्र बनणार सामाजिक परिवर्तनाचे व्यासपीठ; डॉ. नितीन गायकवाड यांनी स्वीकारला समन्वयक पदाचा पदभार



​किनवट : येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड उप केंद्र असलेल्या के. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्राच्या समन्वयक पदाचा पदभार डॉ. नितीन गायकवाड यांनी स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी केंद्राला केवळ प्रशासकीय केंद्र न ठेवता, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संशोधनासाठी एक प्रभावी व्यासपीठ बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.

​विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी सोपवलेली ही जबाबदारी सार्थ ठरवू, असा विश्वास डॉ. गायकवाड यांनी दिला. केंद्राचे मावळते समन्वयक डॉ. मार्तंड कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांनी ही सूत्रे स्वीकारली.

​पुढील कार्याची 'त्रिसूत्री'

​डॉ. नितीन गायकवाड यांनी केंद्राच्या भावी कार्यासाठी तीन प्रमुख उद्दिष्टे स्पष्ट केली:

​विद्यार्थी विकास: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षमतांना राष्ट्रीय स्तरावर नेणे.

​सांस्कृतिक संवर्धन: स्थानिक ज्ञान आणि लोकसंस्कृतीचे जतन करणे.

​कौशल्य विकास: रोजगाराभिमुख उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे.

​मान्यवरांची उपस्थिती

​हा सोहळा प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन आणि कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाची प्रस्ताविका डॉ. योगेश आंबुलगेकर यांनी केली. यावेळी व्यासपीठावर सह-समन्वयक डॉ. सुनील व्यवहारे, डॉ. शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विनायक गव्हाणे, विधी तज्ज्ञ अ‍ॅड. सुनील येरेकर,  यांच्यासह डॉ. प्रमोद राठोड, प्रा.प्रीती देशथले व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रेयश पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. चेतन जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages